रोटरी क्लब दोंडाईचा व मुस्लिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
महिलासाठी मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन
दोंडाईचा अख्तर शाह
3 डिसेंबर रविवारी दोंडाईचा शहरातील गरीब नवाज कॉलनी येथे गर्भवती महिलांसाठी व 40 वर्षा वरच्या महिलांसाठी रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात 152 महिलाना औषध उपचार करण्यात आले त्याचबरोबर त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ मोहित अग्रवाल, डॉ.सौ मंजुलता अग्रवाल, डॉ सौ पारुल अग्रवाल,
डॉ प्रफुल दुगड,आदिनी माता बघनिची आरोग्य तपासणी केली. शिबिरामध्ये लहान मुलांचे प्रसिध्द डॉ. चेतन बच्छाव,यांनी लहान मुलांचे अरोग्य तपासणी केली
डॉ. दिपाली अग्रवाल यांनीही लहान मुलांची तपासणी केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे अध्यक्ष गुलाम रसूल शेख , सचिव सतीश पाटील सर , अनिश शहा, हर्षीद पटेल ,राकेश जयस्वाल, आदींनी परिश्रम घेतले
तसेच मुस्लिम सेवा संघातर्फे मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष
मंजुम पठान.
शरीफ मंसूरी,मोहसिन मनियार,मुश्ताक शाह,जाकिर लोहार इरफान सय्यद,युनुस पिंजारी .आदिल शैख , हमजा पठान, हुसैन मोमिन,जहूर खाटीक. सादिक मंसूरी,जमील खाटीक, डॉ. जोहरा
शाह.यावेळी माता बघनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

