राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे अनुदान मिळावे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचाकडे अरुण धोबी यांची मागणी*




*राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे अनुदान मिळावे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचाकडे अरुण धोबी यांची मागणी*

      शिरपूर : धुळे जिल्ह्यातील गेल्या एक वर्षापासुन राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे अनुदान मिळाले नाही आहे. ज्या महिलांचे पती वारले त्यांना एकवेळेस वीस हजार रुपये तहसिलदार कार्यालयातील इंगांयो शाखेतील कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत सदर लाभ केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातुन हि रक्कम मिळत असते मात्र गेल्या डिसेंबर महिन्यापासुन विधवा महिलांना मंजुर रक्कम मिळाली नाही आहे. लाभार्थ्यांना अनुदान देणे आतापर्यंत प्रलंबित आहे. म्हणुन मुंबईतील बांद्रा कलानगर येथे सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा निवासस्थानी (दि. ३० नोव्हें) रोजी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी भेट घेवुन सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, ग्रामविकास तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना. गिरीष महाज यांना निवेदनाची प्रत दिली आहे. शिरपूर येथील इंगांयो शाखेतील मंजुर रक्कम मिळावी यासाठी अनेक महिला कार्यालयात वारंवार अनुदानबाबत विचारणा करीत असतात. याबाबत अनेक महिलांनी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांना हि माहिती दिली होती. त्यानुसार सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सदरील महिलांना मंजुर वीस हजार रुपये राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. केंद्रीयमंत्री ना. रामदास आठवले यांनी निवेदनाची दखल घेवुन लागलीच संबंधीत अधिकारी यांचाशी मोबाईलवर संपर्क साधला व शिरपूर, शिंदखेडा, साक्री व धुळे इंगांयो शाखेतील राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत मागील एक वर्षापासुनचे जवळपास ७०० ते ८०० मंजुर लाभार्थीची अनुदान रक्कम तात्काळ वर्ग करण्यात यावे असे सुचित केले. त्यामुळे आता लवकरच शिरपूर, शिंदखेडा, साक्री व धुळे इंगांयो कार्यालयातील मंजुर लाभार्थीची लाभार्थ्यांना अनुदान रक्कम मिळणार आहे. अशी माहिती धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने