२ जणांसह 49 उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्याt घेऊन कारवाई
शिरपूर - कत्तलीच्या उद्देशाने कच्छभुज येथून गोंदियाकडे उंट घेऊन जात असल्याचा संशयावरून २ जणांसह 49 उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर-शहदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे.दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.सदर उंट तालुक्यातील वरूळ येथील गोशाळेत रवाना करण्यात आली तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोन द्वारे माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरु करत अवैधरीत्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाभाई कानाभाई रबारी वय २२ रा.कुकडसर भद्रेश्वर कच्छ व बाराभाई मंगुभाई रबारी वय ६० रा.झापडी जि भुज गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले. सदर उंट कचभुज येथून आणण्यात आले. ते ग्रामीण भागातून गोंदिया कडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी सुमारे ९ लाख ८० हजाराचे ४९ उंट जप्त केले आहेत. तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांकडून पहिलीच कारवाई आहे. सदर उंट कुठे व कशासाठी जात होते याचा तपास पोलिस करणार आहेत.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत खैरनार, उपनिरीक्ष सुरेश, सोनवणे,डि.बी.पथकाचे ललित पाटील,रविंद्र आखडमल,प्रशांत पवार,मनोज दाभाडे,आरिफ तडवी,दादाभाई बोरसे,विनोद आखडमल,भटु साळुंखे येगेश दाभाडे गोविंद कोळी मनोज महाजन,सचिन वाघ,चालक रविद्र महाले, विजय पाटील आदींनी कारवाई केली. शहर पोलिसांच्या यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
