ब्रिटिश कालीन बंधाऱ्याच्या गाईड वॉल देखभाल व दुरुस्ती च्या कामाचा शुभारंभ
शहादा - सुमित गिरासे
तालुक्यातील ब्रिटिश कालीन कवळीथ येथील बंधाऱ्याच्या गाईड वॉल देखभाल व दुरुस्ती च्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला सदर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मागणी केली होती
तालुक्यातील पूर्व दिशेला गोमाई नदीवर कवळीथ येथे ब्रिटिश कालीन बंधारा आहे सुमारे 25 पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व 30 हेक्टर पेक्षा अधिक शेतीच्या सिंचनासाठी या बंधा-याचा अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरी व नागरिक वापर करीत आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती झाल्याने पावसाळ्यात अडविलेले पाणी वाहून जात होते परिणामी पाणी असतानाही त्याचा योग्य तो लाभ परिसरातील नागरिकांना घेता येत नसल्याने या बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकांकडून केली जात होती
नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा आमदार राजेश पाटील यांनी सातत्याने राज्य सरकारकडे केला कवळीथ वळण बंधाराच्या दुरुस्ती व देखभाली साठी अनेक वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांची नागरिकांची मागणी होती. परिसरातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या या बंधाऱ्याच्या देखभालीने व दुरुस्तीमुळे परिसरातील 20 हुन अधिक गावातील 30 हेक्टर जमीन सिंचना खाली येईल.
मागील काळात मतदारसंघातील जाम- वागडदा, डामळदा या परिसरातील बारा बंधाऱ्यांचा निर्मितीमुळे आज हा परिसर सुजलाम सुफलाम झालाय शेतात नगदी पिकं यायला लागली आहेत. ही आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळात मतदार संघात सिंचनाच्या मोठ्या योजना आणून परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मनोगत यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केले
या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 26 लाख 98 हजार रुपये निधी मंजूर केल्यानंतर तात्काळ या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात येऊन बुधवारी सकाळी कवळीथ येथे बंधाऱ्याच्या साखर कारखाना साईट कडील गाईड वॉलच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन करून आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, विनोद जैन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, भाजपा ता.अध्यक्ष शातीलाल पाटील,दिनेश खंडेलवाल, राजा पाटील,मोहिदे त. श.चे भाऊ भाई पाटील, जे. पी. पाटील, सरपंच कवळीथ सुरेखाबाई सखाराम पवार, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ सोनार प्रदेश सदस्य डॉक्टर किशोर पाटील अंतू पाटील भागापुर सरपंच पंडित मोगरे, टुकी सरपंच कैलास मुसळदे, लोहारा सरपंच देवसिग महाले, जावदा सरपंच संजय माळी, कोचरा सरपंच नवनाथ वाघ, सुलतानपुर सरपंच मोहन आवासे, जवखेडा सरपंच मनिलाल सुर्यवंशी, खेडदिगर सरपंच गणेश बागूल, कुरगी सरपंच प्रथमेश सोनवणे, दामळदा उपसरपंच डॉ विजय चौधरी, सावखेडा उपसरपंच मनेष पवार, पिंपर्डे उपसरपंच घनश्याम मराठे, जाम सरपंच सुभाष वाघ, गोगापुर योगेश पाटील, मुकेश माळी, असलोद किशोर मराठे, गोपाल गांगुर्डे, प्रशांत कुलकर्णी योगेश पाटील व ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित होते.
चौकट
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बंधाऱ्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचे तसेच मतदार संघातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देत यावर सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली त्यावर चर्चा होऊन राज्य शासनाने मतदार संघातील सिंचन प्रकल्पासाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे लवकरच हा निधी प्राप्त होणार असून त्यातून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील मतदार संघातील सिंचन प्रकल्पात बारामाही पाणी उपलब्ध राहणार असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे
आमदार राजेश पाडवी शहादा विधानसभा
परिसरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया-
मागील अनेक वर्षापासून या बंधाऱ्याचे
काम रखडल्यामुळे अनेक गावांना व परिसरातील शेतकऱ्यांना समस्या निर्माण होत होत्या. आमदार साहेबांच्या पाठपुरावाने व विशेष प्रयत्नाने आज बंधाराचे भूमिपूजन होतंय या भूमिपूजनाने परिसरातील अनेक गावांचे शेतकरी आनंदित आहे. हा
बंधारा परिसरातील शेतकऱ्यांची जलवाहिनी म्हणून ओळखला जातो. नदी जेवढे दिवस वाहते तेवढ्या दिवस पाणी असतं आणि बंधारात जेवढे दिवस पाणी असतं तेवढे दिवस शेतीची काम ही प्रगतीपथावर असतात, या बंधाऱ्यामुळे परिसरात पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होण्यासाठी मोठी मदत होणार आहे
परिसरातील शेतकरी
