Breaking News
अखेर चेअरमन प्रसन्न जैन यांचे संचालक पद अपात्र,
भावास बेकादेशीर रित्या दिलेले कर्ज भोवले
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील नामांकित सहकारी बँक दि. मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेचे माजी चेअरमन श्री प्रसन्न जैन यांना बँकेच्या संचालक पदापासून अपात्र करण्याचा आदेश झाला आहे. विशेष म्हणजे त्यांना अपात्र करण्यासाठी बँकेचे विद्यमान सभासद यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरील कामकाज पूर्ण होऊन त्यांना अपात्र करण्याच्या निर्णय देण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैसा ठेवी म्हणून ठेव असलेल्या शिरपूर शहरातील द शिरपूर मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक मागील काही दिवसांपासून प्रकाश झोतात असून सभासद व ग्राहकांची विश्वासार्हता यामुळे कमी झाली आहे. यापूर्वी देखील याच बँकेतून माझी चेअरमन व संचालकांवर 50 लाख रुपयांचे बेकायदेशीर कर्ज वितरित करण्याच्या आरोप झाला आहे. आणि आता माझी चेअरमन व संचालक व संचालक प्रसन्न जैन यांच्यावर त्यांचे बंधू हर्षद जयराज जैन यांना जुलै 2023 महिन्यात तीस लाख रुपयांचे विना तारण कर्ज बँकेचे नियम अटी डावलून देण्यात होते. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार सदरचे कर्ज हे नियम बाह्य असून सहकार कायद्याच्या भंग आहे असा आरोप बँकेचे विद्यमान सभासद गोपाल कन्हैयालाल मारवाडी, मोहन साहेबराव पाटील,ओंकार चैनसिंग जाधव, भरत बाजीराव रोकडे, डॉक्टर सरोज डी पाटील यांनी केला होता. म्हणून त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर यांना चौकशी करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. या चौकशीमध्ये देखील जैन यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते . त्यामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणी नंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे मनोज चौधरी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था चे अधिनियम अन्वये प्रसन्न जयराज जैन यांचे नि शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शिरपूर या बँकेचे संचालक पद रद्द करण्याचे आदेश केला आहे.
त्यामुळे या प्रकरणात सत्याच्या विजय झाला असून आम्हास प्राथमिक न्याय मिळाला आहे अशी भावना तक्रारदार यांनी व्यक्त केली आहे.
मात्र त्यांना फक्त ही शिक्षा पुरेशी नसून त्यांच्याकडून त अनियमित रकमेची रक्कम वसूल करून फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील तक्रारदार यांनी केले आहे.
