इंदापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी S.T.D. गुलामगिरीतून मुक्त व्हा : आमदार गोपीचंद पडळकर प्रतिनिधी दत्ता पारेकर




इंदापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी  S.T.D. गुलामगिरीतून मुक्त व्हा : आमदार गोपीचंद पडळकर

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांची  'धनगर जागर यात्रा'  या कार्यक्रमाची जाहिर सभा पार पडली. आमदार गोपीचंद पडळकर हे संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा जागर करत आहेत.

 इंदापूर शहरात आमदार गोपिचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर जेसीबीनेच्या साह्याने पुष्प वृष्टी करण्यात आली.  दीपक काटे व मित्रपरिवारने क्रेनच्या साह्याने हार घालण्यात आला.  नंतर त्यांची शहरातून घोड्यावरून  हलगीच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. 
आमदार गोपीचंद पडळकर सभास्थळी पोचल्यावर धनगर समाजाच्या वतीने 'एकच छंद गोपीचंद ' या घोषणेने परिसर दुमदुमून निघाला होता. 

 या सभेचे  प्रस्ताविक माऊली चौरे यांनी केले . त्यानंतर इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने विलास वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात आरक्षणाची सध्याची परिस्थिती व पुढील दिशा कशी असेल याबाबत मार्गदर्शन केले. (S.T.D.) S म्हणजे साहेब,  Tम्हणजे ताईसाहेब, D म्हणजे दादासाहेब सावध राहा. असे त्यांनी सांगितले . आपला एकच साहेब बाबासाहेब असेही  त्यांनी सांगितले .

 यावेळी विलास वाघमोडे, बाबासाहेब डोंबाळे, प्रकाश शिंदे, पोपटराव पवार,  महेंद्र रेडके, आबासाहेब देवकाते , गजानन वाक्षे, अशोक चोरमले, दिपक काटे, माऊली वाघमोडे,सचिन आरडे , तुकाराम करे, माउली वाघमोडे,आबा थोरात,आकाश कांबळे, शिवराज गावडे , बापुसाहेब पारेकर,  विष्णुपंत मकर ,अनिता खरात व इतर मान्यवर उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने