थाळनेर पोलीस स्टेशनची गांजा शेतावर कारवाई ४९,९९, ३६५/- रुपये किंमतीचा गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त




थाळनेर पोलीस स्टेशनची गांजा शेतावर कारवाई

  ४९,९९, ३६५/- रुपये किंमतीचा  गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी बभळाज शिवारातील भिवखेड पाडा येथील गांजाचे शेतावर कारवाई करुन एकूण ४९,९९, ३६५/- रुपये किंमतीचा १४२८.३९० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

दि. १८/१०/२०२३ रोजी मा. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिरपुर विभाग, शिरपुर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भिवखेड पाडा बभळाज शिवार येथे एक इसम तो कसत असलेल्या त्याचे ताब्यातील वन जमिनीवरील शेतात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ (गांजा) ची बेकायदेशीररित्या लागवड केली आहे. त्याबाबत त्यांनी पुढील कारवाई करणे बाबत थाळनेर पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. दिपक पावरा यांना प्राधिकार पत्र देऊन आदेशीत केले होते.

त्यावरुन सहा. पोलीस निरीक्षक दिपक पावरा यांनी सदर बातमीची माहिती मा. पोलीस अधीक्षक, धुळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांना कळवून छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी मा. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग, शिरपुर, राजपत्रित अधिकारी श्री. महेश साळुंके, नायब तहसीलदार शिरपूर, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच थाळनेर पो.स्टे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह बभळाज भिवखेड पाडा ता. शिरपूर जि. धुळे शिवारात जाऊन शोध घेऊन १६.१० वाजेच्या सुमारास इसम नामे मुसा मालसिंग पावरा, रा. महादेव ता. शिरपुर जि. धुळे ह.मु. भिवखेडपाडा बभळाज शिवार ता. शिरपुर हा कसत असलेल्या वनजमिनीचे शेतात छापा टाकला असता त्या शेतात भुईमुंग व तुरीचे पिकात मध्यभागी गांजासदृश्य अंमली पदार्थांचे वनस्पतींच्या झाडांची लागवड करुन शेती केलेली दिसली. सदर इसम शेतात मिळून आला नाही. त्याचे शेतात मिळून आलेल्या एकूण ४९,९९, ३६५/- रुपये किंमतीचा १४२८. ३९० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करुन त्याचे विरुद्ध पोहेकॉ / १०८६ शामसिंग कर्मा वळवी यांनी फिर्याद दिल्यावरुन गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा हे करीत असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो स्टे प्रभारी श्री. दिपक पावरा, पोहेकॉ  शामसिंग वळवी, पोहेकॉ संजय धनगर, पोना भुषण रामोळे, पोकॉ उमाकांत वाघ, पोकों किरण सोनवणे, पोकॉ दिलीप मोरे, पोकों प्रविण गोसावी, पोकॉ भाऊसाहेब मालचे, होमगार्ड  राकेश कोळी, राहुल कोळी, सुकदेव कोळी, पंकज धनगर तसेच आर. सी. पी. पथक शिरपुर अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने