विसरवाडीत अग्रवाल व्यापाऱ्याचा घरात मध्यरात्री दरोडा, मुलीच्या सर्तकतेमुळे ४ सशस्त्र दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात



विसरवाडीत अग्रवाल व्यापाऱ्याचा घरात मध्यरात्री दरोडा, मुलीच्या सर्तकतेमुळे ४ सशस्त्र दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

विसरवाडीत भरवस्तीत मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. 

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे कुभांर गल्लीत भरवस्तीत असलेल्या एका व्यापारी यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकला असता दरोडेखोऱ्यांचा यशस्वी प्रयत्न मुलीच्या सतर्कतेमुळे असफल, ४ सशस्त्र दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात.. सिनेस्टाईल पद्धतीने दरोड्याचा घटनाक्रम व्यापारी अग्रवाल यांच्या जीवीतासह मोठी वित्तहानी टळली.... 

सदरील घटना शुक्रवारी (दि. २० ऑक्टोंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. 


घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतले, तर एक जण घटनास्थळावरुन निसटला होता. एका फरार दरोडेखोरास शोधण्यासाठी तास दोन तास पोलिसांनी व सतर्क नागरिकांनी सर्वत्र परिसर पिंजून शोधाशोध सुरू केली. रात्री अंधाराचा फायदा घेत पळून एक दरोडेखोर पळुन जाण्यास यशस्वी झाला होती. मात्र त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने