इंदापूर शहरात उद्या होणार मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा प्रतिनिधी दत्ता पारेकर




इंदापूर शहरात उद्या होणार मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा 

प्रतिनिधी दत्ता पारेकर

 पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात उद्या शनिवार दिनांक 21/ 10/ 2023 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवीन तहसील कचरे शेजारी दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे . या सभेसाठी अंदाजे एक लाख मराठा बांधव भगिनी उपस्थित राहतील असा अंदाज समन्वयकांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने या सभेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 पार्किंग व्यवस्था बारामती रोड आयटीआय मध्ये मैदान, अकलूज रोड पालखीतळ ,सोलापूर रोड जुने मार्केट कमिटी इंगोले मैदान, कालठण रोड भारत गॅस गोडाऊन, पडस्थळ रोड भारत गॅस मैदान, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती समन्वयकाच्या वतीने देण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने