आदिवासी कोळी समाजातर्फे शिरपूर फाट्यावर रास्ता रोको व पुतळा दहन
आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी जळगाव येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ व शासनाने वाल्मिकी महामंडळ निर्माण करण्याच्या निर्णयाच्या विरोधात शिरपूर तालुका आदिवासी कोळी समाजाकडून शनिवारी सकाळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जमा आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
विनाअट आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांच्यासह विविध 10 मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकार्यांनी 10 ऑक्टोबर मंगळवारपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.मात्र सदर आंदोलनाची शासन प्रशासनाने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही तसेच राज्यात आदिवासी जमातीसाठी शबरी महामंडळ असतांना व मागणी नसतांना शासनाने वाल्मिकी महामंडळ निर्माण करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित विषयाना बगल देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नाविरोधात शिरपूर तालुका आदिवासी कोळी समाजाकडून शनिवारी सकाळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जमा आंदोलन करण्यात आले.आंदोलनावेळी आंदोलन कर्त्यांकडून मुख्यमंत्री,पालकमंत्री आणि शासनाविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करीत पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.यावेळी शहर पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी नितीन आखडमल,दिनेश कोळी,
हिरा कोळी,महेश सावळे, दिपक श्रीराव,वाल्मिक कोळी,शेखर कोळी,गोलू कोळी,राहुल कोळी,योगेश कोळी आदी शहरातील आणि तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
