पैलवान अक्षय भटू माळी याची विद्यापीठ स्तरीय स्पर्धेकरिता निवड*



*पैलवान  अक्षय भटू माळी याची विद्यापीठ स्तरीय स्पर्धेकरिता निवड*

 शिरपूर -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभाग अंतर महाविद्यालयीन कुस्ती पुरुष स्पर्धा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नरडाणा तर्फे जिल्हा क्रीडा संकुल धुळे ते संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये पैलवान अक्षय भटू माळी यांने आपल्या ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यावर मात करत एक हाती विजय मिळवून धुळे विभागीय कुस्ती संघामध्ये निवड झाली. सदर यशस्वी  कामगिरीबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे सचिव सचिव नानासाहेब निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे, प्राचार्य एस.एस राजपूत, विश्वस्त रोहित रंधे,उपप्राचार्य डॉ.फुला बागुल,डॉ एस.पी महीरे ,क्रीडा संचालक डॉ एल.के प्रताळे ,आदींनी त्याचे अभिनंदन केले.अक्षय हा शहरातील प्रसिद्ध व्यवसाईक भटु माळी यांचा मुलगा असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने