विखरण येथे राष्टवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस संतोष पांडुरंग मराठे यांचा जाहीर सत्कार




विखरण येथे राष्टवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस संतोष पांडुरंग मराठे यांचा जाहीर सत्कार 

विखरण ता शिरपूर जिल्हा धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील  यांच्यां आदेशाने , नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी विखरण येथील हल्ली मुक्काम राहणार मुंबई( भोईसर ) येथील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  मा.संतोष पांडुरंग मराठे (साळुखे) साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती झाल्याने विखरण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  कार्यकर्त्यांकडुन व गाव परिसरातील नागरिकांकडून जाहीर अभिनंदनपर सत्कार व कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबरराव शंकर पाटील सर होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  म्हणून शहादा येथील प्रसिद्ध उद्योगपती शामभाऊ जाधव नाशिकच यथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ बोराणे उपस्थित होते 
 या प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाचे शिरपुर तालुका अध्यक्ष संजय खंडु पवार, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक  मराठा कल्याण सुरत ट्रस्टचे अध्यक्ष व स्वाभिमानी मराठा महासंघ गुजरात प्रदेशचे अध्यक्ष मनोजदादा यशवंत पवार , माजी सरपंच शामकांतजी सुभाष पाटील ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साहेबराव पाटील ,काशीनाथ पाटील, किशोर पाटील यांच्यासह  उपस्स्थित मान्यवरांच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते मा.संतोष मराठे साहेबांचा शाल व श्रिफळ  पुष्प गुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला .

यावेळी मा. संतोष मराठे साहेब यांनी उपस्थितांना शेती पुरक उद्योग व्यवसाय व सुशिक्षित बेरोजगारांना , व शेतकऱ्यांना शती विषयक शासनाच्या विविध योजना संदर्भात , व  पाण्याचे सिंचन नियोजन, व ग्रामीन भागात पाण्याच्या योग्य पाणी पुरवठा, जनआरोग्य, स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले .
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मनोजभाऊ यशवंत पवार व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग शिरपुर तालुका अध्यक्ष संजय खंडु पवार यांनी केले
या प्रसंगी कार्यकर्ते मनोज अशोक पाटील , दगाजीराव शिंदे , निरंजन पवार ,  संजय गंभीर पाटील , प्रविण पुरुषोत्तम चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाईदास पाटील ,  दिनेश लोटन पवार , नितीन  पाटील  , गोपालभाऊ चव्हाण, सोमनाथ शिंदे , विजय  पाटील व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने