*नवरात्रीचे औचित्य साधून अँटी करप्शन ब्युरो (लाप्रवि) महिला अधिकारी व कर्मचारी यांचा मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या वतीने यथोचित सत्कार समारंभ उत्साहात संपन्न*
*अँटी करप्शन ब्युरो (लाप्रवि)कार्यालय नासिक येथे मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या वतीने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिला अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्यात खालील सत्कारार्थींचा यथोचित सत्कार सम्मान करण्यात आला*.
लाचलुचपत प्रतिबंध व्हावा या साठि जिद्दीने व मेहनतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उत्कृष्ट कामगिरी बजावण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला अधिकारी, कर्मचारी देखील हिरिरीने आपले कार्य चोख बजावत आहेत. याच अनुषंगाने मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
*शर्मिष्ठा घारगे - वालावलकर*
*पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नाशिक. श्रीमती वैशाली पाटील पोलीस उपअधीक्षक नाशिक. श्रीमती मीरा आदमाने पोलीस निरीक्षक नाशिक. श्रीमती गायत्री जाधव पोलीस निरीक्षक नासिक. श्रीमती नीलिमा डोळस पोलीस निरीक्षक नाशिक. श्रीमती ज्योती शार्दुल पोलीस नाईक नाशिक. श्रीमती ज्योती पाटील पोलीस नाईक नाशिक. श्रीमती क्षितीजा रेड्डी महाराष्ट्र पोलीस शिपाई नाशिक. श्रीमती शितल सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस शिपाई नाशिक. श्रीमती वर्षा बागले निम्न श्रेणी लघुलेखक नासिक. श्रीमती गायत्री कुलथे प्रमुख लिपिक लिपिक नाशिक. श्रीमती वनिता महाजन वरिष्ठ श्रेणी लिपिक नाशिक. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे माननीय श्री अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांचा देखील याच सत्कार समारंभात आवर्जून सत्कार करण्यात आला*.
सदर सत्कार समारंभास मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे युवराजसिंग राजपूत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, कमलाकर लिटे महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष, राकेश मोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एडवोकेट सुरेंद्र सोनवणे महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार ,सुषमा बोरसे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख महिला, महेश मोठे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख, शामल भावसार नाशिक जिल्हाध्यक्ष महिला, हेमंत भावसार सदस्य व इतर संघटणेचे पदाधिकारी सत्कार समारंभास उपस्थित होते.
