आयशरची दुचाकीस धडक दोन तरुण ठार
शिरपूर/प्रतिनिधी
बभळाज ता.शिरपूर येथील बन्सी फाट्याजवळ दि.८ आक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिरपूर कडुन चोपडा कडे भरधाव जाणाऱ्या आयशर क्रमांक जि.जे २३ ए.डब्लु ८०९० ने बभळाज कडुन अजनाड बंगला कडे जाणारी होंडा कंपनीची दुचाकीस जोरदार धडक दिल्याने अजनाड बंगला ता.शिरपूर येथील संतोष खिमा राठोड वय २५ वर्ष हा जागीच ठार झाला व बभळाज येथील नारायण हिरामण राठोड वर ४० वर्ष हा गंभीर जख्मी झाला होता
.तात्काळ गावकरींनी अपघात स्थळी धाव घेत जख्मीना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर पाठवले.या वेळी डॉक्टरांनी तपासणी करून नारायण राठोड यास मृत घोषीत केले.नारायण यास एक मुलगी,दोन मुले व पत्नी असा परीवार आहे.दोघांच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहीत मिळताच थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनी दिपक पावरा कर्मचारींसह घटनास्थळी दाखल झाले होते. संतोष राठोड याने चार दिवसांपुर्वीच होंडा कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.दोघांवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

