महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक नाशिक येथे संपन्न
नाशिक - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक नाशिक येथे घेण्यात आली. या आढावा बैठकीत नाशिक शहर, नाशिक ग्रामीण,अहमदनगर शहर ,अहमदनगर ग्रामीण, नंदुरबार, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धुळे शहर, धुळे ग्रामीण, मालेगाव शहर असा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीची सुरुवात पत्रकारांन सोबत संवाद करत झाली. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे गटनेते तसेच माजी महसूल मंत्री आ. श्री बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री श्रीमती शोभाताई बच्छाव, सरचिटणीस प्रकाश सोनवणे, निरीक्षक राजाराम पानगव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष परागजी पाष्टे, धुळे जिल्हाध्यक्ष श्याम दादा सनेर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तसेच नाशिक जिल्ह्याचे प्रभारी डॉ. श्री राजु वाघमारे, सहप्रभारी श्री. ब्रिज दत्त ,प्रदेश सचिव श्रीमती हेमलता पाटील, प्रदेश सचिव श्री. राहुल दवे, नंदुरबार जिल्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, दिलीप नाईक, तालुका अध्यक्ष सुरेश नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास दादा नाईक माजी पंचायत समिती उपसभापती किशोर पाटील, किसान प्रदेश सदस्य अशोक पाटील युवक जिल्हाध्यक्ष विक्की पाटील, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मकसूद खाटीक, वाजीद सैयद, गोपी पावरा, लगन महाराज, सर्व सेलचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री गणेश रघुनाथ पाटील (राजे) तसेच नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
