बोरगाव सरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया



बोरगाव सरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया

शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव येथील तत्कालीन सरपंच श्रीमती काशिबाई तानकू भिल यांच्या विरोधात 5 विरुद्ध 2 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याने विद्यमान उपसरपंच तथा शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांच्या कडे सरपंच पदाची जबाबदारी व कर्तव्य पार पाडावीत असा आदेश शिरपूर गट विकास अधिकारी श्री संजय सोनवणे यांनी दिला आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि बोरगाव ग्राम पंचायतीच्या एकूण 7 सदस्यां पैकी 5 सदस्यांनी दि 25.08.2023 रोजी शिरपूर तहसिलदार श्री महेंद्र माळी यांना प्रतक्ष भेटून तत्कालीन सरपंच श्रीमती काशिबाई तानकू भिल यांच्या विरोधात अविश्वास ठरावा बाबत अर्ज दिला. त्या नुसार तहसिलदारांनी दि 01.09.2023 रोजी बोरगाव ग्राम पंचायत येथे अविश्वास ठरावा बाबत मतदान घेतले ज्यात काशिबाई तानकू भिल यांच्या विरोधात 5 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले.

तहसिलदार श्री महेंद्र माळी यांनी 5 विरुद्ध 2 ने अविश्वास ठराव मंजूर केल्याचा आदेश दिला. परंतु तत्कालीन सरपंच श्रीमती काशिबाई तानकू भिल यांनी तो आदेश मान्य केला नाही व आपल्या वरील अविश्वास ठरावाच्या आदेशा विरुद्ध अपिलात गेल्या व जिल्धाधिकारी धुळे यांचा कडे अर्ज दिला की अविश्वास ठरावासाठी 6 ग्राम पंचायत सदस्यांनी विरोधात मतदान करायला हवे. त्यासंदर्भात नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे सुनावणी झाली व पुढील तारीख देण्यात आली.

गावातील विकासाला आळा बसू नये व ग्राम पंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे म्हणून जोपावेतो सरपंच अविश्वासाचा निर्णय लागत नाही तोवर सरपंच पदाची जबाबदारी अधिकृत पणे योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या कडे देण्यात आल्याचा आदेश पंचायत समिती शिरपूर कडून ग्राम पंचायत बोरगाव ला प्राप्त झाला आहे.

या अगोदर देखील उपसरपंच असतांना योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी गावात अनेक विकास काम केलीत ज्यात गावाच्या स्थापनेपासून गावात नसलेले अमरधाम बांधकाम माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल यांच्या निधीतून मंजूर केले, आमदार श्री काशिरामदादा पावरा यांच्या निधीतून आदिवासी वस्तीत कॉन्क्रेटीकरण, मा जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शिफारशीने जल शुद्धीकरण प्रकल्प, जि प सदस्या सौ अभिलाषाताई भरत पाटील यांच्या निधीतून शेत शिवार रस्ता, शाळेची वर्ग खोली, अंगणवाडी दुरुस्तीकरण, पं स सदस्या सौ विठाबाई निंबा पाटील यांच्या निधीतून भूमिगत गटार, विद्यमान जि प उपाध्यक्ष श्री देवेंद्रदादा पाटील यांच्या कडून देखील विकास कामासाठी निधी मंजूर केला, तसेच गावातील गोरगरिबांचे विविध योजनेतून मासिक अनुदान प्रकरणे मंजूर केलेत, रेशन कार्ड नसलेल्या ग्रामस्थाचे रेशन कार्ड बनवून दिले, असे विविध कामे श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केलीत.

आता पुढील काळासाठी बोरगाव च्या सरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया यांना जबादारी मिळाल्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने