खोटे जात वैधता प्रमाणपत्र भोवले, उपसरपंचांवर गुन्हा



खोटे जात वैधता प्रमाणपत्र भोवले, उपसरपंचांवर गुन्हा

अक्कडसे (ता. शिंदखेडा) - ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र बाबत तक्रार झाल्यानंतर ते बोगस सिद्ध झाल्यावर उपसरपंच पदावर असलेल्या महिला सदस्या सदरचे प्रकरण भवले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कडसे च्या उपसरपंच खटाबाई कोळी अनुसूचित जमाती या प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याची फसवणूक करून ते प्राप्त केल्या प्रकरणी शिंदखेडा येथील निवासी नायब तहसीलदार शारदा बागले यांनी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून उपसरपंच कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

अक्कडसेच्या उपसरपंच खटाबाई गोपीचंद कोळी पूर्वाश्रमीच्या खटाबाई भिका चव्हाण यांच्याविरोधात शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास रामदास कोळी यांनी नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रारी दाखल केली होती.

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठी खटाबाई कोळी यांनी निवडणुकीत राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र बनावट व बोगस दाखल केले आहे, अशी तक्रार केली होती.

या तक्रारीवरून प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यपद धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबरला अपात्र घोषित केले होते.

श्रीमती कोळी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिंदखेडा निवासी नायब तहसीलदार शारदा बागले यांना प्राधिकृत केल्यावरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात उपसरपंच कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने