वस्तीशाळा निमशिक्षकांना सेवेत सामावून घ्या: बिरसा फायटर्सची मागणी* *मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन;आमरण उपोषणाला पाठिंबा*




*वस्तीशाळा निमशिक्षकांना सेवेत सामावून घ्या: बिरसा फायटर्सची मागणी*

*मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन;आमरण उपोषणाला पाठिंबा*

नंदूरबार:वस्तीशाळा निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घ्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद नंदूरबारचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनवणे,जिल्हाध्यक्ष राजकुमार वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.शिक्षणाधिका-यांना लेखी पत्र द्यायला सांगतो,असे आश्वासन सीईओ यांनी दिले.बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांचीही भेट घेत निवेदन दिले.
              बिरसा फायटर्स संघटनेने उपोषणकर्त्यांना  आमरण उपोषणाला बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा देत आहोत, असे पत्र दिले. वस्तीशाळा शिक्षक आपल्या मागण्यांसाठी  कुटुंबासह दिनांक २ ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हा परिषद नंदूरबार समोर आमरण उपोषणास बसलेले आहेत. गेल्या १० वर्षापासून नंदूरबार येथील प्राथमिक शिक्षण विभागाला आठ दिवसाचा मुहूर्त मिळत नाही. सर्व शिक्षा अभियानाचे निमशिक्षक १० वर्षापासून जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. दिनांक०१/०४/२०१४ चा अधिनियमाचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने उल्लंघन करून निमशिक्षकांना १० वर्षे सेवेपासून वंचित ठेवले आहे.प्राथमिक शिक्षण विभागाचा उदासिनतेमुळे सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी निमशिक्षकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी सदर वस्तीशाळेतील निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाला देण्यात आला आहे.
[07/10, 9:45 am] Sushil kumar Pawra Redar: बिरसा फायटर्सचे १६ ऑक्टोबरला जिल्हा परिषद नंदूरबार समोर ठिय्या आंदोलन!

शिक्षण विभागाबाबत नाराजी;भ्रष्टाचारावर प्रहार

नंदूरबार:बिरसा फायटर्स संघटनेचे शिक्षण विभागाशी संबंधित विषयावर व भ्रष्टाचारा-यांवर कारवाई करा, या मागणी जिल्हा परिषद नंदूरबार समोर दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन जिल्हा परिषद नंदूरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार व नंदूरबारचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,राजकुमार वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 
                      सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा,पेसा शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी,जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांवर स्थानिक डीएड ,बीएड धारक उमेदवारांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी,शाळेला पक्की इमारत, वर्गांना स्वतंत्र खोली,शौचालय, पाणी,विज इत्यादी सुविधा देण्यात याव्यात,विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे,शाळेत न जाणा-या कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी,गेल्या ४-५ वर्षापासून शाळेत न येणा-या शिक्षकांची जागा रिक्त करून नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी,वस्तीशाळेतील निमशिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे,शिक्षकांचे पगार, फरकबीले मंजूर करण्यास दिरंगाई करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,जिल्हा परिषद व पंचायत समितीशी संबंधित विविध योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवणा-या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी,जिल्हा परिषद व पंचायत समितीसंबंधित विविध योजनांत,निधीत भ्रष्टाचार करणा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशा विविध मागण्यांसाठी दिनांक १६/१०/२०२३ रोजी दुपारी १ वाजता  जिल्हा परिषद नंदूरबार समोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने