पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव “युवारंग २०२३” जळगाव येथे सहभाग
फोटो - जळगाव येथील एम. जे. महाविद्यालयात आयोजित “युवारंग २०२३” साठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादाचा संघाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपकभाई पाटील सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. पवार व विद्यार्थी
शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग तर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव अर्थात युवारंगसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादाचा संघ आज दिनांक ०७/१०/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता रवाना झाला. आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव अर्थात “युवारंग २०२३” जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
दिनांक ०७/१०/२०२३ ते ११/१०/२०२३ पर्यंत आयोजित युवारंगसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादाचा संघ अतिशय उत्साहात रवाना झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांच्या सादरीकरणासाठी ०८ ऑक्टोबर २०२३ पासून रंगणाऱ्या विद्यापीठास्तरीय युवारंग महोत्सवात सहभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत महाविद्यालय सहभाग घेणार आहेत. वर्ष २०२२ मध्ये पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना व संघ प्रमुख यांना पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपकभाई पाटील, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. या युवारंग महोत्सवात उत्कृष्ट प्रदर्शन करून यशस्वी होऊन जास्तीत जास्त पारितोषिक घेऊन यावे असा मानस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपकभाई पाटील यांनी व्यक्त केला आहे.