विजयादशमी - सज्जनांचा दुर्जनांवर विजय* पत्रकार रणवीर राजपूत,



*विजयादशमी - सज्जनांचा दुर्जनांवर विजय*

पत्रकार रणवीर राजपूत,

बंधू-भगिनींनो,विजयादशमी अर्थातच दसरा आपण आश्विन शुद्ध दशमीला साजरा करत असतो.नवरात्र संपल्यावर दसरा हा सण आपण विजयोत्सव म्हणून साजरा करत असतो.हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते.मराठी लोकं तर,या दिवशी सोनं खरेदी करतात.या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान केल्यावर पुस्तकांची,अवजारांची आपट्याच्या पानाने पूजा केली जाते.तर ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र असतात,ते त्यांची पूजा करतात.वास्तविक पहाता,हा सण विजयाचं प्रतीक मानलं जातं.या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोने(आपट्याची पानं) लुटतात अन् एकमेकाला आपट्याची पानं देऊन गळाभेट घेत शुभेच्छा देतात.आपापसातील मतभेद,दुरावा,वितुष्ट,वैमनस्य यांचा परित्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारणं,एकमेकांविषयी बंधूभाव,स्नेह व


सदभाव ठेवणं,हाच हा सण साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

 दसऱ्याला विजयादशमी म्हणण्यामागे काही आख्यायिका आहेत. 


मां पार्वतीदेवीने महाकालीचा (कालरात्री)अवतार घेऊन महिषासुर,शुंभ,निशुंभ,


रक्तबीज या राक्षसांचा वध केला.हे युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चालले.महाकालीने दैत्यांचा पाडाव करत विजयश्री संपादन केली अन् दहाव्या दिवशी काशी क्षेत्रात प्रवेश केला.हा विजयोत्सव 


काशीवासियांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला.या पार्श्वभूमीवर सदर सणाला विजयादशमी म्हटलं जातं.

त्याचप्रमाणे दुसऱ्या एका आख्यायिकात प्रभू रामचंद्रांनी दशमुखी रावणाचा वध करून विजयश्री संपादन केल्यावर आश्विन शुद्ध दशमीला प्रभू रामचंद्र,


सीतामैय्या,लक्ष्मण यांचे अयोध्यानगरीत आगमन झाले.त्या दिवशी त्यांचे 


भव्यदिव्य स्वागत करून 


अयोध्यावासियांनी 


विजयोत्सव साजरा केला.म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात.

दसरा हा सण खऱ्या अर्थाने लक्ष्मी अन् सरस्वतीदेवीचा म्हणजेच धन व विद्या यांची उपासना करण्याचा दिवस असतो.या दिवशी सायंकाळी महिला लक्ष्मीपुजनासह आपल्या घरातील दागदागिण्यांची पूजा करून देवीला आपट्याची पानं वाहतात.

विद्यार्थी पण ह्या  दिवशी आपल्या 


वह्या-पुस्तकांवर आपट्याची पानं वाहून मनोभावे पूजा करतात.व्यापारी हे आपल्या चोपड्यांची,शेतकरी व कारागीर आपल्या अवजारांची तर,सैनिक हा आपल्या शस्त्रांची आपट्यांची पानं वाहून पूजा करतात.या दिवशी घरातील कर्ते माणसं सिमोल्लंघन करून सोनं लुटत देवीचे दर्शन घेतात.त्यानंतर घरी आल्यावर गृहिणी त्यांचे औऔक्षण करतात.त्यानंतर ते घरात प्रवेश करतात.मित्रहो,


आदिशक्तींनी अन् प्रभू रामचंद्रांनी दैत्यांचा नाश करून त्यांच्या जाचातून रयतेची मुक्तता करत दुष्टप्रवृत्तींचा नाश केला अन् प्रजेला सुखी,आनंदी व भयमुक्त जीवन प्रदान केलं.आपल्या हिंदू धर्मातील देवीदेवतांचे अनुकरण करून आपण सर्वांनी समाजातील दुष्टप्रवृत्तींचा,गुंडागर्दीचा, भ्रष्टाचाराचा आणि 


आतंकवादी कारवायांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध होणं ही काळाची गरज आहे.महत्वाचे म्हणजे राज्यासह देशातील राजकीय पक्षांनी निवडणुकांपुरतं राजकारण करावं.त्यानंतर मात्र सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून देशाची एकता,अखंडता व 


सार्वभौमत्व अधिकाधिक मजबूत करण्यासाठी एकजूट व्हावं,असं आवाहन करण्यात येते.समस्त नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! परमपूज्य आदीशक्ती एवं प्रभू रामचंद्र यांना त्रिवार वंदन!




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने