शिरपूरला पतपेढीच्या कर्मचाऱ्याने नवीन वीज कनेक्शनच्या डिमांड नोटच्या भरणावर मारला डल्ला,
शिरपुर( प्रतिनिधी)
शिरपूर येथील यशवंत नागरी पतपेढीच्या कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याने नागरिकांनी दिलेल्या नवीन वीज कनेक्शनच्या डिमांड नोटच्या भरणा न करता त्यावर डल्ला मारला. नागरीकाने सदर कर्मचाऱ्यास चोप दिल्यानंतर भरणा करण्यात आला आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील हेमंत चौधरी यांनी मांडळ शिवारात घर बांधण्यासाठी महावितरण कडे वीज मीटर साठी ऑनलाईन अर्ज केला होता. महावितरण करून मंजुरी २५/९/२३रोजी शिरपूर शहरातील यशवंत नागरी पतपेढीत अधिकृत विज बिल भरणा केंद्र वर मुलाला पाठवून ३१५९ रुपयाची डिमांड नोट भरली होती. परंतु पतपेढीच्या कर्मचाऱ्याने विद्यार्थी बघून भरणा पावती दिली नाही. सदर भरणा ऑनलाईन झाला असून लवकरच तुम्हाला मीटर मिळेल असे सांगितले व घरी पाठवले. महावितरण डिमांडचा नोट भरणा करुन २०/२५ दिवस झाल्यानंतर नवीन विज मीटर न आल्याने हेमंत चौधरी यांनी महवितरण करवंद ऑफिसला विचारणा केली. महावितरण ऑफिस मधून त्यांना सांगण्यात आले की आपण ऑनलाइन डीमाड नोट भरली नाही. हेमंत चौधरी यांनी मुलास पतपेढीत पाठवून पावती मागायला सांगितले. यावेळी विद्यार्थ्यास बघून संदीप धाकड नामक कर्मचाऱ्याने उडवा उडवीचे दिले. यावेळी मुलाने त्याच्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क करून दिल्यानंतर कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने घाबरून आजचा ऑनलाइन भरणा करून पावती दिली. पतपेढीत नागरिक दुपारी आल्यानंतर कर्मचाऱ्यास जाब विचारल्यानंतर त्याने उडवा उडवी ची उत्तर देत माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरली. संतप्त नागरिकाने पतपेढी बाहेर कर्मचाऱ्यास चोप दिला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पतपेढीचे चेअरमन किरण दलाल यांनी मध्यस्थी करत नागरिकास पोलिसात न जाण्याची विनंती केली. व या वादावर पडदा पडला.
शहरात खाजगी वीज भरणा केंद्र कार्यरत आहेत मात्र अनेक वेळा नागरिकांनी वीज बिलाच्या भरणा करून त्यांना त्या तारखेची पावती दिली जाते मात्र प्रत्यक्षात काही वीज भरणा केंद्र हे आपल्या सोयीने भरणा करतात त्यामुळे अनेक वेळा उशिरा भरणा झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना देखील ग्राहकाने भरण्या केल्याच्या दिवशीच पैसे जमा करण्याचे बंधन केले पाहिजे अशी देखील मागणी काही ग्राहकांनी केली आहे.
