राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चा महाराष्ट्रभिमान दौरा व जिल्हा आढावा बैठक व व्यापक मेळावा उत्साहात संपन्न .
धुळे -राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चा महाराष्ट्रभिमान दौरा व जिल्हा आढावा बैठक व व्यापक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
दि. २२/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमदार श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. महेबूबभाई शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी कडलग तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस धुळे निरीक्षक श्री. राहुलजी शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष डॉ.मनोज उत्तमराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल गणपती पॅलेस, मालेगाव रोड, धुळे येथे दि. २२/१०/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांच्या हस्ते बैठकीस उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतांना डॉ.मनोज उत्तमराव महाजन यांनी त्यांच्या संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीचा कार्यपूर्ती अहवाल माननीय प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या कडे सादर केला.
या प्रसंगी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे ,म.प्र.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. पुरषोत्तम कडलग,श्री.ललित वारुडे कार्याध्यक्ष,धुळे जिल्हा तसेच माजी आमदार व शिक्षक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री. दिलीपराव सोनवणे, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष श्री. रंजित भोसले,या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.महेबूब भाई शेख यांनी धुळे जिल्ह्यातील उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माननीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार घेऊन फिजिकल + डीजीटल= राष्ट्रवादी पार्टी चे संघटन मजबूत करून आगामी निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा रोवण्याचे काम करण्याचे जाहीर आवाहन बैठकीत केले.
बैठकीस ज्येष्ठ नेते श्री. एन.सी.आबा पाटील , अल्पसंख्यांक आघाडीचे ज्येष्ठ नेते श्री.जोसेफ मलबारी ,प्रदेश महिला चिटणीस सौ.छायाताई सोमवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.उषाताई पाटिल,धुळे महानगर युवक अध्यक्ष श्री.वाल्मिकभाऊ मराठे,धुळे शहर महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती शकीला बक्ष, म.प्र.राष्ट्रवादी किसान सभा सरचिटणीस श्री गिरीश नेरकर,धुळे जिल्हा राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष श्री.सयाजीराव ठाकरे, ज्येष्ठ नेते श्री रमेश आबा करनकाळ,श्री.वेंकटेश पाटील,शिंदखेड्याचे जेष्ठ नेते श्री.गुलाबराव पाटील,डॉ.शांताराम पाटील,श्री.विनोद बच्छाव,धुळे , श्री.दत्तुदादा पाडवी,श्री.अशपाक सैय्यद तसेच महिला प्रमुख पदाधिकारी युवती उपस्थित होत्या. तसेच धुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच धुळे, शिरपूर ,साक्री शिंदखेडा, धुळे शहर तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, सभासद व युवक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. महेबूब भाई शेख यांनी तालुकानिहाय सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. धुळे जिल्ह्यातील युवकांचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करुण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड सदर बैठकीमध्ये करण्यात आल्या.
नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठींबा देत साहेबांवर प्रेम करणारे सर्व आघाड्यांचे सम्मानिय अध्यक्ष/प्रमुख पदधिकारी, युवक, महिला, अल्पसंख्यांक, आदिवासी व विविध विभागातील सर्व सन्माननीय पदाधिकारी ,कार्यकर्त बंधु बैठकीस आवर्जून उपस्थित होते. बैठकीस जेष्ठ नेते श्री. एन.सी. आबा , श्री. रमेश आबा करंकाळ, श्री. दत्तू दादा पाडवी- सरपंच मोहिदा,श्री.नितीन देसले असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. महेबूब भाई शेख यांनी युवकांना मार्गदर्शन करत असताना, धुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांना सामोरे जात असताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचा मोलाचा सहभाग राहणार असून त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागून १ बूथ २० युथ संकल्पना राबविण्याकरिता आवश्यक उपाय योजना करण्यासाठीचे मार्गदर्शन केले व उपस्थित पदाधिकारी व युवक कार्यकर्ते यांनी देखील चर्चा करून त्याच्या सर्व शंकांचे समाधान बैठकीत करण्यात आले.
बैठकीचे सर्व नियोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री. डॉ. मनोज उत्तमराव महाजन यांनी केले होते. सदर बैठकीस व चर्चा सत्रास युवकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित मान्यवर व प्रमुख अतिथी यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धुळेचे श्री. हेमराजभाऊ राजपूत यांनी केले व राष्ट्रगीत होऊन बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.
बैठक यशस्वी होण्याकरिता युवक कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.



