शहा गावात होणार श्री संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा प्रतिनिधी दत्ता पारेकर




शहा गावात होणार श्री संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: इंदापूर तालुक्यातील शहा गावात श्री संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा गुरुवार दिनांक 26/ 10 /2023 रोजी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी पार पडणार आहे .
तसेच महाआरती देखील होणार आहे महाआरती झाल्यानंतर दुपारी एक ते पाच या वेळेत धनगरी गजर नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. हे गजी मंडळ निकम वाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील आहे या गजीमंडळाचे प्रमुख श्री हनुमंत माने आहेत.

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या  भाविक भक्तांना श्री बाळासाहेब नामदेव इजगुडे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे‌. अशी माहिती वैजनाथ महाराज दिली .तरी जास्तीत जास्त श्री बाळूमामा भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान वैजनाथ महाराज यांनी यावेळी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने