ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील यांनी घेतली दखल



ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील यांनी घेतली दखल


शिंदखेडा
जि.प आदर्श शाळा पढावद ता शिंदखेडा जि धुळे तर्फे आदिवासी वस्तीवर ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखणे ' मुलांची गैरहजेरी कमी करणे' शाळेत दररोज नियमित व वेळेवर येणे या विषयावर  जाणीवजागृती व उद्बोधन शिक्षक -पालक- विद्यार्थी मेळावा घेण्यात आला, वीर - एकलव्य व  सरस्वतीच्या पुजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य श्री मंगेशआबा पवार प्रमुख पाहुणे तालुक्याचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के पाटील ,केंद्रप्रमुख श्री.पी . पी.सांगळे ,आदिवासी वस्तीवरील संपुर्ण महिला,पुरुष पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री शामकांत ठाकरे यांनी मुलांसाठी शासनाच्या विविध योजना तसेच शिक्षणाची गरज,पालकांची अनास्था,शाळेचे सुरु असलेले मुलांसाठी विविध उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच गरिबीतून मार्गक्रमण करणारे व गरिबीची परिपूर्ण जाणीव असणारे गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के. पाटील साहेब यांनी ऊसतोड मजूर व मुलांची गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व त्यामुळे होणारे  गंभीर परिणाम सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाच्या योजना,शैक्षणिक उपक्रम तसेच शिक्षण सर्वांसाठी किती गरजेचे आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मंगेशआबा पवार यांनी अशिक्षितपणा मुळे तुमची कशी फसवणूक होते ? आणि कुटुंबाची कशी बरबादी होते याविषयी  मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील गैरहजर विद्यार्थी नियमित शाळेत येण्यास मदत होईल तसेच स्थलांतरित होणाऱ्या पालकांनी गावातच राहून शिक्षण प्रवाहात टिकून राहतील याबाबत पालकांनी आश्वासित केले. कार्यक्रमास गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षण प्रेमी, एकलव्य मंडळाचे तरुण युवक ,आणि विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग महिला व पुरुष पालकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.शिक्षक श्री छोटू पवार यांनी आभार व्यक्त केले  .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने