गांजाची शेती करणाऱ्यावर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



गांजाची शेती करणाऱ्यावर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई,

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

9 लाख 74 हजार रुपये किमंतीचा तब्बल 1 क्विंटल 39 किलो गांजा जप्त..!!

नंदूरबार - अंमली पदार्थ मुक्त जिल्हा मोहिम तिव्र विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा (Drugs Free District ) या संकल्पनेची सुरूवात नंदुरबार येथून करण्यात आली. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. तसेच नंदुरबार जिल्हा भविष्यात देखील अंमली पदार्थ मुक्त राहावा यासाठी नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणायांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.

दिनांक 09/10/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील बुरुमपाडा गावातील एका इसमाने त्याचे मक्कीच्या पिकाचे शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणान्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करून त्याची जोपासना करीत आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत व म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे तसेच त्यांचे एक पथक तयार करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत व म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे तसेच अधिकारी व अमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे बुरुमपाडा गावातील एका शेताजवळ आले. शेतात कौलारू घराजवळ मक्कीच्या पिकाचे शेतात दोन इसम हालचाली करत असल्याचे दिसुन आले. म्हसावद पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच शेतातील दोन्ही इसमांनी तेथून पळ काढला. परंतु म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकांनी पळून जाणाऱ्या इसमांपैकी एका इसमास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास नाव गाव विचारले असता कोणसिंग आगरशा नाईक, वय-34, रा. नवे तोरणमाळ, ता.शहादा, जि. नंदुरबार असे असल्याचे सांगितले. बुरुममाळपाट

2

म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने मक्कीच्या पिकाचे शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे संपूर्ण शेतातून 1 क्विंटल 39 किलो 14 ग्रॅम वजनाचे 9 लाख 73 हजार 980 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळून आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच आरोपी नामे कोणसिंग आगरशा नाईक, वय 34, रा. नवे तोरणमाळ, बुरुममाळपाडा ता.शहादा, जि. नंदुरबार याचेविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 281/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 15 (क), 17 (क), 18(क), 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच फरार आरोपीताला देखील लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. सुनिल पाडवी, रचना शिंदे, गुलाबसिंग पावरा, पोलीस हवालदार बहादूर भिलाला, भिमसिंग ठाकरे, किरण वळवी पोलीस अंमलदार राकेश पावरा, चंद्र सावळे, रामसिंग सोनार, योगेश निकुंभ, सचिन तावडे, मिनाक्षी गावित, मेहली वळवी, प्रवीण पवार यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने