*रविंद्र टाटिया सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित**
दोडाईचा (अख्तर शाह)
दि. 01 ऑक्टोबर रविवार रोजी धुळे येथील अजय लॉन्स नगाव बारी धुळे येथे राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला कर्नल गणपती श्रीनिवासन, भाऊसाहेब शिवाजी अकलाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, प्रमोद पाटील हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.या कार्यक्रमात दोंडाईचा येथील श्री रविंद्र मोहनलाल टाटिया सरांना राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक सन 2023 या वर्षाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार धुळे येथे थोर महान शिक्षक तज्ञ माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने देण्यात आला.
रवींद्र टाटिया सर हे मागील 27 वर्षापासून दोंडाईचा येथे नामांकित टाटिया क्लासेसच्या माध्यमातून इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना गणित विषयात अध्यापन करून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले असून गणित विषयात निष्णांत शिक्षक आहेत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयात 25 ते 30 विद्यार्थ्यांना शंभर पैकी 100 गुण मिळूवून उत्तीर्ण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
सामाजिक क्षेत्रात जायंट्स ग्रुप ऑफ दोंडाईचा चे संस्थापक अध्यक्ष ,दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष तसेच नाशिक मर्चंट को-ऑप बँक चे ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि भारतीय जैन संघटना जिल्हा कार्यकारणी सदस्य आदी विविध पदांवर कार्यरत आहेत. आपल्या कामात कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, वक्तशीर, मेहनती अशी त्यांची ओळख आहे.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली असून त्यांचे हजारो विद्यार्थी विद्या विभूषित करण्यात ते यशस्वी ठरले आहेत व त्यांचे विद्यार्थी उच्च पदावर उत्तम प्रकारे कार्य करीत आहेत. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शैक्षणिक, राजकीय,सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
