*दोंडाईचात शिवरत्न जिवाजी महाला यांना अभिवादन.**
दोंडाईचा (अख्तर शाह) छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न विर जिवाजी महाला यांची आज दि. ९ रोजी ३८८ वी जयंती साजरी करण्यात आली.
दोंडाईचा शहर नाभिक समाजाच्या वतीने शहरातील महादेवपुरा येथे श्रावण भदाणे सलून दुकान येथे अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ सल्लागार भाऊराव सौंदाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आला.
याप्रसंगी नाभिक समाजाचे दुकानदार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे, नाभिक समाज हितवर्धक संस्थेचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते, दोंडाईचा नाभिक युवक मंडळाचे शहराध्यक्ष समाधान ठाकरे, दिलीप सैंदाणे, दुकानदार संघाचे शहराध्यक्ष किरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, बन्सीलाल चित्ते, गोकुळ सैंदाणे, कैलास चित्ते, अनिल ईशी, राजेंद्र मोरे, राजेश मिस्तरी, भगवान चित्ते, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
