**राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी पूजा खडसे यांची निवड**
दोंडाईचा(अख्तर शाह) शहरातील सामाजिक कार्यकर्त्या पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ पूजाताई खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली आहे..
दि.ऑक्टोबर रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते अन्य नवनियुक्त पदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
धुळे शहर जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार,धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलाश चौधरी, प्रमोद साळुंखे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सौ पूजाताई खडसे यांच्या निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या माजी राज्यमंत्री डॉ. हेमंतराव देशमुख माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे किरण शिंदे किरण पाटील धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे अमित पाटील, राजेंद्र देशमुख, शिवसेनेचे शैलेश सोनार, बापूजी मिस्तरी, गणेश चकणे, बिलाल बागवान, रईस बागवान, या सह आदिनी अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या.
