शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रम मुंबई येथील मातोश्री भवन येथे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यात शिवसेना सक्षम होण्यासाठी व शिवसेनेची ताकद या कार्यकर्त्यांमुळे वाढणार असून त्यामुळे शिवसेनेचे राजकीय बळ तालुक्यातून वाढत आहे.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे शिवबंधन बांधून धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरपूर तालुकाध्यक्ष युवराज पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपूर माजी सरचिटणीस नितीन निकम, राष्ट्रवादीचे शरद पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. याप्रसंगी माजी मंत्री व शिवसेना नेते मा. सुभाषजी देसाई, शिवसेना नेते मा. अरविंदजी सावंत, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोकजी धात्रक, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख शरद पाटील सर, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगीताई पाटील, सह संपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी, जिल्हाप्रमुख. हेमंत साळुंखे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करनकाळ,शिरपूर विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, युवती सेना विस्तारक प्रियांका जोशी व जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
तालुक्यातील व जिल्ह्यातील शिवसैनिकांनी या नवीन पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले असून एकजुटीने पक्ष संघटन वाढवून पक्षाची ताकद धुळे जिल्ह्यात निर्माण करण्याच्या संकल्प केला आहे.
