वाचन लेखन चळवळ अंतर्गत,साठी सचित्र बालमित्र हे उजळणी पुस्तकाचे वाटप

वाचन लेखन चळवळ अंतर्गत,साठी सचित्र बालमित्र हे उजळणी पुस्तकाचे वाटप



   शिरपूर -  युवक मित्र परिवार पुणे चे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री प्रवीण महाजन सर यांच्या आदर्श घेऊन निरक्षरतेचे प्रमाण कमी व्हावे , व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचता लिहिता यावी.म्हणून इयत्ता पहिली व दुसरी इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंक अक्षर ओळख सुलभ व्हावी यासाठी सचित्र बालमित्र हे उजळणी पुस्तक श्री अरविंद दिलीप खैरनार पाटील सर यांनी स्वखर्चातून दोनशे पुस्तक पुणे येथून श्री युवक मित्र परिवाराचे प्रवीण महाजन सर यांच्याकडून मागवली व आदिवासी दुर्गम भागातील पाड्यावरील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा दुर्बड्या  जिल्हा परिषद शाळा उंटावद व आई बिजासनी देवी माध्यमिक विद्यालय दुर्बडया येथे पंचायत समिती शिरपूर च्या सभापती सौ लताबाई वसंत पावरा यांच्या हस्ते सचित्र व बालमित्र पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता.
सदर पुस्तक वाटप वेडी श्री दिलीप पाटील सर ,डोळे सर ,विजया सुर्यवंशी मॅडम अरविंद खैरनार सर ,गोपाल सोनार सर ,अमोल सोनार सर ,संदीप देवरे, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने