हिस्सेवाटणीच्या रागातून जिवघेणा हल्ला,उपचारादरम्यान एकाचा मृत्यू शिरपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

हिस्सेवाटणीच्या रागातून  जिवघेणा हल्ला,उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

शिरपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना


शिरपूर - शिरपूर तालुक्यातील एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून हिस्सेवाटणीच्या रागातून भाऊबंदकीतून झालेल्या वादातून करण्यात आलेल्या  जिवघेणा हल्यात एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे हिस्सेवाटणीच्या रागातून भाऊ आणि दोन पुणे यांनी जिवघेणा हल्ला केला होता. रक्तबंबाळ अवस्थेत धुळे येथे उपचार सुरु असतांना रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे गट क्रमांक १६० या शेतीच्या हिस्सेवाटणीवरून  झालेल्या वादात व केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून खुनाची घटना घडली आहे. प्राणघातक हल्ला बाबत थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात फिर्यादीत म्हटले की, जैतपूर येथील विजयसिंह राजपूत यांची जैतपूर गावाच्या शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीच्या वाटे हिस्स्यावरून विजयसिंग यांचे भाऊ देवनाथसिंग राजपूत,व पुतणे अमोल राजेसिंग राजपूत व प्रदीप राजेसिंग राजपूत यांच्यात वाद होते. दि. १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजयसिंग राजपूत हे मुलगा प्रशांत राजपूत व पृथ्वीराज राजपूत (५५) असे पोळा सणानिमित्त बैल घेण्यासाठी शेतात गेले होते. बैल घेऊन घरी येत असताना रस्त्यात देवनाथसिंग व अमोल आणि प्रदीप असे त्यांचे बैल सजवीत होते. यावेळी प्रदीप राजपूत याने पुन्हा येथे दिसले तर तुमचा मुडदा पडेल अशी धमकी देत यानंतर शेतात पाय ठेवायचा नाही.त्यावर त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ केली होती. त्यानंतर दि. १५ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान शेताच्या वादातून देवनाथसिंग राजपूत, अमोल व प्रदीप या तिघांनी संगनमत करून विजयसिंह राजपूत यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगडाने व डोझरच्या पासावर डोके ठोकून गंभीर जखमी केले होते. विजयसिंह राजपूत यांना रक्तबंबाळ बेशुध्दावस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळ्यातील श्री सिध्देश्वर या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबत पोलीसांनी देवनाथसिंग राजपूत,अमोल राजेसिंग राजपूत व प्रदीप राजेसिंग राजपूत यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

दि 16 रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजयसिंह राजपूत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे. विजयसिंग राजपूत यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून थाळनेरचे सा. पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली आहे.याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने