प्रा. डॉ. इंदिरा गिरासे यांना धुळे येथील ध्येय मानवी विकासाचे रायबा बहु उद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. इंदिरा गिरासे यांना धुळे येथील ध्येय मानवी विकासाचे रायबा बहु उद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान



शिरपूर : श्रीमती एच आर.पटेल कला महिला महाविद्यालयातील संरक्षण शास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. इंदिरा गिरासे यांना नुकताच ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून धुळे येथील ध्येय मानवी विकासाचे रायबा बहु उद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान केला.


डॉ. इंदिरा गिरासे यांना हा पुरस्कार त्यांच्या समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहून विदयार्थी आणि समाज घडवून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान दिल्याबद्दल त्यांना या सेवाभावी संस्थेने गौरविले आहे.

डॉ. इंदिरा गिरासे या दूरदृष्टीच्या शिक्षिका आहेत. वक्तृत्व, सूत्रसंचालन या कौशल्यात त्या पारंगत आहेत. सामाजिक कार्याची आवड यासाठी याही आधी त्यांना विविध मान्यवर संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत.


त्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालय प्राचार्य डॉ. शारदा शितोळे, उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने