मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी - हर्षवर्धन पाटील _आरक्षण मागणे हा मराठा समाजाचा हक्क प्रतिनिधी दत्ता पारेकर

मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी - हर्षवर्धन पाटील

_आरक्षण मागणे हा मराठा समाजाचा हक्क

प्रतिनिधी दत्ता पारेकर 



             पुणे :मराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड ) येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीमाराची घटना दु:खद व दुर्दैवी आहे. या दुर्दैवी घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
          ते पुढे म्हणाले, मराठा समाज बांधवांचा आरक्षण मागणे हा हक्क आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी आम्ही सर्वजण मराठा आंदोलनकर्त्यांसोबत आहोत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे दि.29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. येथील लाठीमाराची घटना ही चुकीची असून, या घटनेची चौकशी करून शासनाने दोषीवर कडक कारवाई करावी.
         मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जगाला आदर्श असे एकूण 57 मोर्चे शांततेत काढले आहेत. अनेक मोर्चात आम्ही स्वतःही सहभागी झालो आहोत. मराठा समाजाने आज पर्यंत इतर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सहकार्य केले आहे, आता  मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने