शिरपुर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; लाल बावटा युनियन व राज्य किसान सभेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा

शिरपुर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; लाल बावटा युनियन व राज्य किसान सभेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा



तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असून शेती पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे शासनाने शिरपुर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने आमोदे येथील रामदेवबाबा मंदिरापासून सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयावर पायी मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले.
            जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने तहसीलदार महेंद्र माळी यांना शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यासह गायराण जमीन, गायराण गावठाण जागा,वृध्द शेतकरी शेतमजूरांचे पेंन्शन, आणि रखडलेले अनुदान रेशन कार्डबबाबत नागरिकांची होणारी पिळवणूक व रेशन काळा बाजार.दहिवद फाटा ते अनेर पुलापर्यंत रस्त्याचे काम,सांगवी दंगलीतील निरपराध आदिवासींवरील गुन्हे मागे घ्या. मजूरांना रोजगार हमी योजनेचे कामे द्यावी ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना ५% टक्के अनूदान द्या.या व आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ऍड हिरालाल परदेशी,लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष पाटील कॉम्रेड वसंत पाटील,रामचंद पावरा, साहेबराव पाटील,कवरलाल कोळी,रविंद्र पाटील,जितेंद्र देवरे,कावा पावरा,अर्जुन कोळी, कैलास पाटील,डॉ.किशोर सुर्यवंशी,सतिलाल पावरा, शिवाजी पाटील,पोपटराव चौधरी आदी पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या नेतृत्वात पीएसआय हेमंत खैरनार यांनी पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने