स्वर्गीय चंदन आबा यांच्या जयंती निमित्ताने स्मृतीस विनम्र अभिवादन, पुतळ्याचे अनावरण
शिरपूर महेंद्रसिंग राजपूत - शिरपूर शहरातील जन सेवक नगरसेवक, जनसामान्यांच्या सच्चा नेता, गरिबांच्या आधारवर, मित्रांचा सच्चा सारथी, जनसामान्यांच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे झटणारा ,लढणारा युवा नेता, प्रसंगी परिवाराची चिंता न करता जनसेवेसाठी स्वतःचे प्राण देखील संकटात टाकून मदत करणारा आरोग्य दूत, जीवनात फक्त पैसा हे सर्व काही नसतं, माणसात माणुसकी शिल्लक असली तर जीवाला जीव देणारी हजारो माणसे निर्माण करता येतात याची मूर्तीमंत उदाहरण जर कोणी असेल तर ते स्वर्गीय चंदन आबा , अशा या सच्चा जनसेवक असलेल्या व मित्रांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आमच्या जिवलग मित्राच्या आज वाढदिवस , आणि हेच आमचे दुर्भाग्य आज आम्हाला आमच्या जिवलग मित्राच्या वाढदिवस नव्हे तर जयंती साजरी करावी लागत आहे. आबांना जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली, आज त्यांच्या द्वितीय जयंती निमित्ताने, सिसोदिया परिवार, सोबत नेताजी केबल नेटवर्क चंदन आबा युथ फाउंडेशन, व सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने स्वर्गीय चंदन आबा यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सोबत आबांचे अपूर्ण असलेले स्वप्न त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर हे देखील पूर्ण करून त्याच्या गृहप्रवेश आज संपन्न झाला.
माणसं येतात माणसं जातात मात्र काही लोक हृदयात घर करतात ज्यांची आठवण अविस्मरणीय अशी असते, आणि या समाजात जन्माला येऊन समाजासाठी जगणारे समाजाला मार्गदर्शक प्रेरणा देणारे, आणि शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या कार्याच्या समाजसेवेच्या ठसा जे लोक उमटवतात त्यांचीच आठवण समाज करत असतो, त्याच महात्म्यांचे पुतळे उभारले जातात, आणि म्हणून मित्र परिवाराने चंदन आबांची अविरत आठवण जपण्यासाठी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या आवडत्या बसण्याच्या जागीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करून अनोखी श्रद्धांजली दिली आहे.
यावेळी चंदन आबा यांचे संपूर्ण परिवार, मित्र परिवार स्नेही , चंदन आबा फाउंडेशन, नेताजी केबल नेटवर्क युथ फ्रेंड सर्कलचे सर्व मित्र परिवार अत्यंत भावुक झाला होता, अत्यंत कठोर हृदयाने अश्रूंच्या धारा डोळ्यातून तरळत असताना परिवाराने व मित्रपरिवाराने श्रद्धांजली अर्पण करत स्वर्गीय चंदन आबांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय चंदन आबांच्या पावलांवर पाऊल ठेवत आबांचे अपूर्ण कार्य, समाजसेवेच्या वसा असाच मित्रपरिवार पुढे नेत राहील असे आश्वासन देत श्रद्धांजली अर्पण केली.
