बांधकामाची परवानगी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी लाच स्वीकारणाऱ्या खाजगी समाज एसीबी कडून अटक

बांधकामाची परवानगी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी लाच स्वीकारणाऱ्या खाजगी समाज एसीबी कडून अटक



धुळे प्रतिनिधी - धुळे लाच लुटपट प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांच्या वाढीव बांधकाम परवानगीसाठी मागणी करणाऱ्या रोख रकमेसह लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत धुळे येथील तक्रारदार यांनी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी खाजगी इसम अहमद वफा अहमद हसन अन्सारी, व्यवसाय- consultant civil engineer वय - 32 वर्ष, इस्लामपूरा शाळा नं 10 जवळ, धुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी यांनी 25000 रुपयांची लाच मागितली होती आणि ती  स्वीकारताना दिनांक 6 /9/ 2023 रोजी स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार यांचे MIDC अवधान धुळे येथील भूखंडावर वाढीव बांधकाम मंजूरीचे काम कार्यकारी अभियंता एमआयडीसी धुळे यांचेकडे प्रलंबित होते.  त्यासाठी आरोपी इसम यांनी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर त्यांचा प्रभाव वापरून तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी एमआयडीसी धुळे कार्यालयातील अधिकारी  यांचे करिता तक्रारदार यांचेकडे 25,000/- रु. लाचेची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम एमआयडीसी धुळे कार्यालयाजवळ स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई .शर्मिष्ठाजी घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक,  ला.प्र.वि, नाशिक. ,नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक,पर्यवेक्षण अधिकारी  अभिषेक पाटील ,पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. यांच्या मार्गदर्शनाखाली
हेमंत बेंडाळे,* पोलीस निरीक्षक. ला.प्र. वि. धुळे.
पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल,  चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे यांच्या पथकाने केले आहे.


*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*@ टोल फ्रि क्रं.1064*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने