*भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिरपूर न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन* *भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिरपूर न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन*

*भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिरपूर न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन*                                                                        

   शिरपूर : (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा शिरपूर शहराच्या वतीने शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चे शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी मुख्याधिकारींना निवेदन दिले. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, शिरपूर शहरात ठिक-ठिकाणी घाणींचे साम्राज्य वाढले असून मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरपूरातील सर्व हॉस्पीटल मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यु, हिवताप, मलेरीया रुगांची संख्या वाढल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. यावर त्वरीत जनजागृती करुन घरोघरी आरोग्य तपासणी व फवारणी करुन यावर त्वरीत उपाययोजना करावी. शहरातील वाढलेले घाणीचे साम्राज्य, घन कचरा त्वरीत हटवीणे अत्यंत गरजेचे आहे. अंबिका नगर, भरतसिंग नगर, क्रांती नगर, भाजी मार्केट परिसर, निमझरी नाका, कुंभार टेक, बौध्द वाडा, मराठे गल्ली, वरवाडे येथील रुग्णांची संख्या वाढल्याने त्यावर त्वरीत उपाय योजना राबवावी, जर रुग्ण खाजगी लॅबमध्ये लघवी, रक्त तपासणी करीता गेल्यास तेथे जास्त पैसे आकारले जातात असे निवेदनात नमुद क रण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्की चौधरी, सरचिटणीस रोहीत शेटे, महेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, रविंद्र राजपूत, विनायक कोळी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष पप्पु राजपूत, संदिप थोरात, मुन्ना राजपूत, गणेश भावसार, जयपाल राजपूत, दिनेश राजपूत, मनोज पाटील, राधेश्याम चौधरी, जगदिश चौधरी, निलेश चौधरी, अमोल लोणारी, दिपक कोळी आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने