सुपर शॉपी तोडून होळनांथे येथे धाडसी चोरी
होळनांथे प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या होळनांथे या गावात होळ गावाच्या नवीन बस स्टँड परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुपर शॉपी चे दुकान मागच्या बाजूने फोडून धाडसी चोरी करत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. सदरची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला एका मोटरसायकल गॅरेजच्या साहित्याची चोरी करून त्याच साहित्याच्या आधार घेत सदरच्या दुकानात चोरी केली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दुकानातील सीसीटीव्ही च्या शोध घेत तो बंद करून त्याच्या मेंन सेट अप बॉक्स काढून चोरून घेतला, या नंतर दुकानांतील खाद्य तेलाचे पाऊच, बिस्कीट, काजू, बदाम, लॅपटॉप ,दुकानांतील चिल्लर, असा एकूण जवळपास तर 65 हजार रुपयांच्या मुद्देमाल या छोट्यांनी पळवला आहे. यापूर्वी देखील सदर दुकानात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून पोलिसांनी याचे व त्यांच्या शोध घेत त्यांना त्वरित जेरबंद करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.
दि. 2 सप्टेंबर ते ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री सदरचे प्रकार घडला असून दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानदार यांनी आपली सुपर शॉपी उघडले असता सदरच्या प्रकार लक्षात आला आहे. सुपर शॉपी चे मालक निखिल वासुदेव राजपूत यांनी थाळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून भादवि कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
