मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निषेध!

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज।

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निषेध!



मुंबई :- जालन्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत्या मार्गाने उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल दि. १ सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या दबावाखाली अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांचा आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो. आपल्या मांगण्यासाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे हे संविधानाने दिलेले अधिकार असताना हे सरकार शेतकरी आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या विरोधात आहे असे या घटनेने सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि तात्काळ राजिनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.

या अगोदर मराठा समाजाने हजारोंच्या संख्येने ५७ मोर्चे आणि अनेक सभा अत्यंत शांततेच्या मार्गाने व शिस्तबद्ध पद्धताने केलेले असताना या वेळी मात्र असे काय घडले की पोलिसांनी बेछूटपणे लाठीहल्ला केला व आंदोलकांवर अश्रुधूर सोडण्यात आला असून राज्य सरकारमार्फत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला गेला आहे. या घटनेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. अशी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाकडून देण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने