धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा

धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी  मोर्चा


शिरपूर --      धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियन मार्फत शिरपूर तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी  मोर्चा सोमवार दि.4/9/2023 रोजी आयोजित करण्यात आला असून यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गायरान धारक, भूमी हिन, रोजगार हमी योजना मजूर,  घरकुलग्रस्त , ग्रामीण कष्टकऱ्यांचा हा मोर्चा  सोमवारी दुपारी 1 वाजता आमोदे येथील रामदेव बाबा मंदिर येथे मोर्चे करू जमून         मांडळ चौफुली मार्गे  मोर्चा जाऊन.  शिरपूर तहसील कार्यालयावर  मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तहसीलदार शिरपूर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.


प्रमुख मागण्या- १) शिरपूर तालुक्यातील गायराण जमीन कसणाऱ्या शेतमजूरांचा नावावर

जमीन करा. जमीनीवरून बेदखल करु नका.

२) गायराण गावठाण जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशींचे घरे नावावर करुन अतिक्रमण नियमानुकूल करा.

३) वृध्द शेतकरी शेतमजूरांना दरमहा ५०००/- पेंन्शनचा कायदा करा. ४) वृध्द निराधारांना केंद्र सरकाचे कमी येणारे अनुदान मागील दीड वर्षांपासून

फरकासह त्वरीत द्या.

५) शिरपूर तालुक्यातील गोर-गरिबांना दारिद्रय रेषेखालील कार्ड व पिवळे रेशन कार्ड त्वरीत द्या.

६) शिरपूर पुरवठा विभागातून नवीन, विभक्त, दुय्यम, रेशन कार्ड देतांना नागरिकांची

होणारी पिळवणूक थांबवा.

७) दहिवद फाटा ते अनेर पुलापर्यंत रस्त्याचे काम त्वरीत करा.

८) सांगवी दंगलीतील निरअपरात आदिवासींवरील गुन्हे मागे घ्या. ९) आदिवासींचे शबरी घरकुल योजनेचे लाभार्थीना त्वरीत अर्थ सहाय्य द्या.

१०) पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजूर व वंचित लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान द्या.

११) घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा करा.

१२) घरकुल योजनेचे अनुदान पाच लाख रुपये करा. 

१३) मजूरांना रोजगार हमी योजनेचे कामे त्वरीत था.

१४) शिरपूर तालुक्यातील रेशन काळा बाजार थांबवा. 

१५) शिरपूर कॉटेल रुग्णालयातून गोर-गरिब रुग्णांना दर्जेदार व पुरेपूर सेवा द्या.

(१६) शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करा.

१७) तरडी येथील जि.प.परिषद केंद्र शाळेत चुकीने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रद्द करा.

 १८) तरडी जि. प. शाळेत एन.आय.सी. कडून दुरुस्ती होत नाही तो पर्यंत चुकीचा संच मान्यतेस स्थगिती द्या, वशिक्षक संख्या कायम ठेवा

 १९) तरडी येथील शिववारी पाडा वस्तीस वनहक्क कायद्याव्दारे मान्यता देवून विद्युत वितरण मार्फत विजेचे पोल बसवा.

२०) ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना ५% टक्के अनूदान द्या. 

२१) अंगणवाडी मार्फत गरोदर स्थनदा माता व बालकांचा आहार व अमृत आहार योजनेचे शिरपूर तालुक्यातील अंगणवाडीची चौकशी करा.

इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
तरी सदरील मोर्चा त  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे    आ वाहन धुळे जिल्हा लाल बावटा शेतमजुर  युनियन अध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड संतोष पाटील, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी, सचिव कॉम्रेड वसंत पाटील, उपाध्यक्ष भरत सोनार, धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष डॉक्टर किशोर सूर्यवंशी, तालुका किसान सभा अध्यक्ष सतीलाल पावरा  लाल बावटा.     शेतमजूर      युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने