रोटरी प्री-प्रायमरी स्कूलमध्ये 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियानांतर्गत उपक्रम
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमतीब संतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियांनातर्गत शासनाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे विविध उपक्रम घेण्यात आले.
देशभक्तीपर गीतांचे गायन, स्वातंत्र्यसेनानींच्या वेशात भूमिका सादर करणे,स्वातंत्र्यसेनानींचे छायाचित्रे हातात घेऊन देशभक्तीपर घोषवाक्य म्हणत काढण्यात आलेली प्रभात फेरी,पंचप्रण प्रतिज्ञा, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमांतून आपल्या मातृभूमीविषयी जनजागृती निर्माण करून भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना देशभक्तांच्या कार्याची माहिती देऊन 'हर घर तिरंगा' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांत सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इन्चार्ज बतुल बोहरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती गोसावी, पूजा गिरासे, रूपाली जैन,योगिता सूर्यवंशी, ललिता फुलझाडे, राजश्री भदाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
