ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बाळदे येथे कृषीदुत दाखल**
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा - बाळदे ता. शिरपूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणारे स्व. वि. संस्थेचे विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील बी.एस.सी ॲग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून बाळदे येथील शेतकऱ्यांना तीन महिन्यापर्यंत शेतीवरील विविध घटकांवर मार्गदर्शन व विविध घटकांचा अनुभव घेण्यासाठी व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
कृषीदूत संकेत अमृतकर, तेजस आवारे, लौकिक बधान, वैभव बागुल, सिद्धार्थ बोचरे उमेश देवरे, विशाल गारसे, चेतन माळी ह्या विद्यार्थ्यांकडून तीन महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांना पीक व इतर शेती घटकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषीदूत म्हणून महाविद्यालयाने निवड केली आहे.
सदर विद्यार्थी तीन महिने बाळदे येथेच मुक्कामी असून शेतकऱ्यांना विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाचे आयोजन करणार आहे, यात शेत जमिनीची माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञानाचा वापर, पिकांवर येणारे रोग व त्या संबंधित माहिती व त्यांचे निवारण आदी विषयांवर मार्गदर्शन करतील. कृषीदुतां-समवेत गावाचे प्रथम नागरिक सरपंच मंदाबाई गरबड भील, उपसरपंच निंबाजी तोताराम पाटील, मा. जि. परिषद सदस्य जितेंद्र राव संभाजीराव पाटील, ग्रामसेवक आर आर पाटील, युवा शेतकरी भटु भाऊसाहेब पाटील तथा इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी राजपूत, उपप्राचार्य आर बी पाटील कार्यक्रम समन्वयक डॉ. विवेक यु. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा इंद्रजीत पी गिरासे व शरद के भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.
