संपादक प्रवीण देशमुख यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया मानाचा पुरस्कार प्रदान



 संपादक प्रवीण देशमुख यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया मानाचा पुरस्कार प्रदान




पुणे प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात वार्ताहर ते संपादक असा संघर्षशील पत्रकारितेच्या प्रवास करून आता दैनिक धडकन लाईव्ह व न्यूज चॅनल धडकन लाईव्ह चे संपादक शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील रहिवासी श्री प्रवीण सिंह देशमुख यांना पुणे येथील एका नामांकित संस्थेकडून ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा पत्रकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.



पुणे येथील नामांकित समजल्या जाणाऱ्या ग्रीन वर्ल्ड तसेच कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व ए वन ग्रुप यांच्या सहप्रायोजकतेत नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे ग्रौन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा अत्यंत मानाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.


पुणे येथील नामांकित असे लेखक, ज्येष्ठ समाजसेवक, हूशार व्यक्तिमत्व असलेले गौतम कोतवाल यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा असा तसेच भव्य पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला होता. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. या ७५ वर्षांच्या वैभवशाली इतिहासात सर्वसामान्य माणूस ते मोठे उद्योजक, शास्त्रश, राजकारणी, डॉक्टर, पत्रकार अशा सर्वांचाच सहभाग आहे. दरम्यान ७५ वर्षात देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या विविध क्षेत्रातील ७५ लोकांचा सन्मान ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व एन वन ग्रुप यांच्या सहप्रायोजकतेत नुकताच पुणे येथील विद्यार्थी गृहाचे मुक्तांगण इंग्लिश स्कूल या ठिकाणी संपन्न झाला.


सदर गोड आणि आनंदी अशा सोहळ्यासाठी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय कणेकर, राम बंधू मसालेचे अध्यक्ष हेमंत राठी, रावेतकर ग्रुपचे अध्यक्ष अमोल रावतकर, विक्रम इन्फोटेक डेव्हलपरचे सीएमडी विक्रम गायकवाड, ग्रीन वल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल, पी.डी.सी.सी. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तब्बल ७५ जनांचा ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा मानाचा पुरस्कार देवून या प्रसंगी सन्मान करण्यात आला. या मध्ये शिरपूर मधील दैनिक धडकन लाईव्ह चे  संपादक प्रवीण देशमुख यांचा देखील हा मानाचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.


पत्रकार क्षेत्रात कार्यरत असताना देशमुख  यांनी आजवर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीतून वाचा फोडून दुर्बल घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी सामाजिक शैक्षणिक अशा अनेक विषयांना वाचा फोडलेली आहे. पत्रकरितेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम केले आहे.


  दरम्यान ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार प्रवीण देशमुख यांचे धुळे जिल्यातील पत्रकार व पत्रकार संघटना यांचे कडून व समाज बांधव यांचे कडून सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने