शिरपूर तालुका पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी, पत्रकार हल्ल्यातील दोषींवर कारवाईसाठी निवेदन

 


शिरपूर तालुका पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी, पत्रकार हल्ल्यातील दोषींवर कारवाईसाठी निवेदन



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुका पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकार संदीप महाजन प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना देऊन कारवाईची मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळेस पत्रकारांच्या संरक्षणासाठी बनवण्यात आलेला कायदा पत्रकार संरक्षण कायदा कूच कमी असून या कायद्यानंतरही पत्रकारांचे कोणतेही संरक्षण होत नसल्याबाबत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. कलमांमध्ये बदल होऊन दखलपात्र गुन्ह्याची नोंद होणे बाबत योग्य तो कायदेशीर बदल सरकारने करावा अशी देखील मागणी पत्रकार संघटनांकडून पुढे येत आहे.

         

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध करण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २२ रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या ११ पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


त्या अनुषंगाने आंदोलन करण्यात येऊन निवेदन देऊन पत्रकारांनी निषेध व्यक्त केला.


    महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करीत किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुसंस्कृत महाराष्ट्रात कायदे मंडळाचा एक सदस्यच कायदा हातात घेऊन आपल्या असंस्कृतपणाचे दर्शन घडवतो, आणि वरती "होय मीच शिव्या दिल्या, काय करायचं ते करा " अशी मस्तवाल भाषा वापरतो हे चिंताजनक, संतापजनक आणि किळसवाणे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई येथे मुख्यमंत्री,गृहमंत्री आदिंना संयुक्त निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.


        यावेळी शिरपूर तालुका पत्रकार संघ वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पत्रकार उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने