पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने शहरात पत्रकारांचे आंदोलन
शहादा--
पत्रकार संरक्षण कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ या कायद्याच्या प्रतिची होळी शहादा तालुका मराठी पत्रकार संघ व विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन शासनास लेखी निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी आमदार व मारहाण करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सर्व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी आंदोलन केले.नायब तहसीलदार एस.एस.चौरे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनाचा आशय असा,उपरोक्त विषयान्वये आपल्या निदर्शनात आणू इच्छितो की, राज्यात पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधी व त्यांच्या गुंडांकरवी पत्रकारांवर हल्ले होतच आहेत.महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलिस प्रशासन पत्रकार संरक्षण कायदयानुसार गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. त्यामुळे कायद्याचा कोणालाही धाक राहिलेला नाही. परिणामी कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचा आम्ही समस्त पत्रकार निषेध करीत असून या कायद्याची होळी करत आहोत. शासनाने या कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही या आंदोलनाच्या निमित्ताने करीत आहोत.यावेळी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले, कमलेश पटेल, गिरधर मोरे, अंबालाल पाटील, दिनेश पवार, रमेश पाटील, किरण सोनार, संजय पाटील, सलाउद्दीन लोहार, धनराज गोसावी, प्रफुल सूर्यवंशी, रघुनाथ बेलदार, रवींद्र चव्हाण, राधेश्याम कुलथे, राजेंद्र बिरारी, दिनेश निकुंभ, विलास मावची, काॅ.ईश्वर पाटील, प्रा.डी.सी.पाटील, सुनील सोमवंशी,प्रा. नेत्रदीपक कुवर, योगेश सावंत, हर्षल साळुंखे, भवरलाल जैन, सुमित गिरासे, राजू मंसूरी, मनोज बिरारी, जगन ठाकरे, संजय मोहिते,राजू कुलकर्णी, विनोद बोरसे आदींची उपस्थिती होती.
