दलेलपुर शिवारात बिबट्याने केलेल्या हल्यात कोमल मुलाचा अस्त* नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



 *दलेलपुर शिवारात बिबट्याने केलेल्या हल्यात कोमल मुलाचा अस्त* 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

सध्या भरपुर काही दिवसांपासुन पाहीले जात आहे की सातपुडा विभागातुन हिंसक प्राणी विविध प्राण्यांना स्वतःच्या आहार बनवत आहेत पण आता मात्र या हिंसक प्राण्यांनी पुढे जाता मानवहानी करायला सुध्दा सुरुवात केलेली आहे.


      तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात शेतात बिबट्याचा हल्ल्यात एक लहान बालकांचे दुःखद निधन  झाल्याची घटना काल दुपारी घडली.

    

     गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्या विषयी बातमी पसरत आहे.सातपुडा परिसराचा अनेक भागामध्ये बिबिट्या मुक्तपणे फिरत आहे.बिबट्याचा मुक्त संचार मुळे मानवावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे शेतकरी व शेत मजुर यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. 

      दलेलपूर शिवारात गुलाब सत्तार धानका व दामू सत्ता धानका यांच्या शेतात बिबट्याने गुरुदेव भरत वसावे वय 11 वर्ष या बालकावर हल्ला केला व बालकाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे,जाण्या पाडवी,आशुतोष पावरा, राहुल कोकणी,डोंगरे आदींनी घटनास्थळी भेट दिली तसेच पंचनामा झालेला असुन.तळोदा पोलिसात नोंद झाली आहे.दलेलपूर अमोनी परिसरात बिबट्यामुळे झालेल्या हल्यामुळे दुसरा बळी गेला आहे.

   बिबट्याचा बंदोबस्त व उपाययोजना करण्यासाठी पीजरा लावावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून वनविभागावाकडे केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने