77 वा स्वातंत्र्य दिन सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेकर वस्ती येथे उत्साहात संपन्न झाला.
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील पारेकर वस्ती येथे ग्रामस्थांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सेवानिवृत्त डि.वाय.एस.पी. अण्णासाहेबजी बंडगर यांनी भूषविले. कर्मयोगीचे संचालक हिरालालजी पारेकर , प्रमुख पाहुणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल भिसे, बिजवडी ग्रामपंचायत सदस्या सौ. नंदाताई पारेकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष दत्तात्रय पारेकर, पांडुरंग पारेकर , माणिकराव पाटील ॲड अनिल पारेकर तुकाराम पारेकर आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.अण्णासाहेब बंडगर यांनी पारेकरवस्ती शाळेस २१००० रुपये किंमतीचा प्रिंटर शाळेला भेट दिला. व वनगळी गावातील शाळेस 25000 किंमतीचा संगणकसंच भेट देण्यात आला आणि , अमोल भिसे यांनी मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यास प्रत्येकी ५०० रुपये दिले व शैक्षणिक कार्यासाठी ३५०० रुपये बक्षिस असे एकुण 5000 रोख रक्कम दिली.
हिरालाल पारेकर व ग्रामपंचायत सदस्य नंदाताई पारेकर यांच्या प्रयत्नातून अंगणवाडीच्या मुलांना व प्राथमिक शाळेतील इतर सर्व मुलांना ग्रामपंचायत बिजवडीच्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
मंथन परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतल्याबद्दल अनिल पारेकर व तुकाराम पारेकर यांनी घोडके सर व पवार मॅडम व भिसे मॅडम यांचा हार,पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
यावेळी पारेकरवस्ती,वनगळी गावातील ग्रामस्थ, तरुण ,महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.विद्यार्थी मनोगते सादर करण्यात आली. बंडगर साहेब यांनी शाळेचे शैक्षणिक कार्य छान चालू आहे असे मनोगतात व्यक्त करीत विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे कौतुक केले. पालकांनी शाळेत सक्रीय सहभाग नोंदवावा ही अपेक्षा व्यक्त केली. खाऊवाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
