दोंडाईचा आश्रमशाळा येथे स्वातंत्र दिवस उत्स्फूर्तपणे साजरा श्रीमान सुरेशजी जैन (चेअरमन रोटरी पतसंस्था दोंडाईचा)यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सपन्न दोडाईचा(अख्तर शाह)

 


दोंडाईचा आश्रमशाळा येथे स्वातंत्र दिवस उत्स्फूर्तपणे साजरा

श्रीमान सुरेशजी जैन (चेअरमन रोटरी पतसंस्था दोंडाईचा)यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सपन्न

 दोडाईचा(अख्तर शाह) 

जैन सोशल ग्रुप दोंडाईचा कडून 320 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप


आज रोजी15 ऑगस्ट 2023 रोजी दोंडाईचा येथील जनजागृत शिक्षण प्रसारक शिक्षण संस्था संचलित  एम आर एम ज्युनियर कॉलेज,वि जा भ ज प्राथमिक  व माध्यमिक आश्रमशाळा दोंडाईचा येथे मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला 

ध्वजारोहण *श्री सुरेशजी जैन साहेब* (चेअरमन रोटरी नागरी पतसंस्था दोंडाईचा ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दोंडाईचा नगरपालिकेचे नगरसेवक व श्री भाऊसाहेब हितेंद्र महाले होते प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री विक्रमजी पाटील,जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री डॉ किशोरजी जैन,सदस्य गणेश कोटेचा,नरेंद्र भंडारी, नवनीत रूणवाल  संस्थाचे मा खजिनदार हेमंत महाले, सौ नंदाताई महाले,संस्था सचिव गौरव महाले,सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले, उत्तम भोई इ  मान्यवर उपस्थित होते

     सुरेशजी जैन यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे लक्ष देऊन शैक्षणिक प्रगती करावी, खेळ,स्पर्धापरीक्षा,आरोग्य,कसरत इ क्षेत्रात लक्ष केंद्रीत करून आपला सार्वंगीन विकास करावा असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना जी काही मदत लागत असेल ती मदत त्यांचाकडून करण्याचे आश्वासन सुरेश जैन यांनी दिले त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब विक्रम पाटील यांनीही आपल्या मनोगतून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले दोंडाईचा शहरात सामाजिक कार्यांत अग्रेसर असणारे जैन सोशल ग्रुप यांच्या कडून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला चार वह्या मोफत वाटप करण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निळकंठ कुलकर्णी सर तर आभारप्रदर्शन श्री जितेंद्र गिरासे सर यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने