Breaking News शिरपूर कळमसरे गावां जवळ पत्र्याच्या गोडाऊन मधून रेशन सदृश्यमाल जप्त जिल्हा पुरवठा अधिकारी व शिरपूर महसूल विभागाची कारवाई,




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील चोरट्या रेशन मालाची तस्करी दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात महिनाभरापूर्वीच मलकातर येथे संशयित रेशन मालाची ट्रक पकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज दुपारच्या वेळेस धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार शिरपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महसूल विभागाच्या पथकासह शिरपूर शहरालगत कळमसरे गावाजवडील चोपडा रोडच्या लगत असलेल्या पत्र्याच्या शेड वर अचानक पणे छापा टाकला असता सदर गोडाऊनमध्ये रेशन सदृश्यमाल आढळून आला.  सदरच्या माल भरत असताना एक आयशर व दोन ऑटो रिक्षा यादेखील मिळून आले असून संबंधित वाहन व त्यासोबत असलेले संशयित यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. गोडाऊन मधील उर्वरित माल हा देखील सरकारी रेशन विभागाची गाडी मध्ये भरून पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

याबाबत महसूल विभागात विचारणा केली असता सदर मला बाबत गोडाऊन मालक व आरोपी याबाबत सध्या चौकशी सुरू असून मिळालेल्या मुद्देमाल व वाहने यावर शासकीय पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे सदरचा माल हा रेशन माल आहे का? तो कोणाचा ? या ठिकाणाहून माल विक्रीसाठी कोठे जात होता? इतक्या मोठ्या प्रमाणावर रेशनच्या माल या गोडाऊनमध्ये आला कुठून? इत्यादी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात अंतिम सत्य समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने