श्रीराम मंदीरात स्वामी नरसिंह सरस्वती समाधी (क्षेत्र आळंदी)सोहळा संत भजनात आनंदोत्सवात सपन्न




                                      शिरपुर— श्रीराम मंदीर येथे दि.६/१/२०२३ रोजी स्वामी नरसिंह सरस्वती (श्रेत्र आळंदी)महाराज समाधी सोहळा पहाटे पासुन पुजाविधी,हवन करण्यात आले शिरपुर तालुक्यातील सर्व भजनी मंडळी त्यात शिवपंथी ,एकतारी खामखेडाकर ह.भ.प.जगन्नाथ महाराज यांनी पहाडी परिसरातुन सर्व भक्तांनी झेंडे लावुन मोटर सायकल रॅली काढुन पाच कंदीलजवळ जय श्रीराम जय घोष करुन  स.९ वा. एकतारी भजनी मंडळांनी भजनांचा आनंद घेतला व ११ वा.नंतर वारकरी,टाळकरी भजनी



 मंडळांनी भजन गायन करत नाचत नाचत भजनांचा आनंद घेतला  संत भजनांचा जनु मेळा होता तसेच मेघश्याम महाराज मठाधिपती श्रीराम बालाजी संस्थान शिंदखेडाकर,महंत पंडीत गुरुजी नासिककर ,परमानंद महाराज शिरपुरकर,किर्तनकार युवराज महाराज नकानेकर,किर्तनकार नाना महाराज नरडाणाकर यांचा श्रीराम देवस्थानतर्फे   श्रीफळ,शाल,श्रीरामाचा फोटो,फुलहार देऊन मान सन्मान करण्यात आला व खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळेतर्फे जेष्ठ वारकरी पुरस्कारार्थी उंटावदकर ह.भ.प.विठोबा महाराज,वाघाडीकर ह.भ.प.विश्वास महाराज,वनावलकर ह.भ.प.मनोहर महाराज,जुने भामपुरकर नानाभाऊ महाराज,वरुळकर ह.भ.प.सुदाम ईशी महाराज,जवखेडाकर ह.भ.प.हनुमंत महाराज,तोंदेकर ह.भ.प.सुरेश महाराज,तोरखेडाकर ह.भ.प. राजाराम महाराज व वनावलकर नाना गुरुजी,दिलीप महाराज  या सर्वा भक्तांचा महंत सतिषदास भोंगे महाराज, भागवतकार प्रमोद भोंगे महाराज,ह.भ.प.संजयबापु महाराज,ह.भ.प.संतोष महाराज,महेंद्र अग्रवाल,कैन्हय्यालाल अग्रवाल,भरत सोनार,गजानन महाराज ह.भ.प.प्रथमेश भोंगे,यांच्या हस्ते मान सन्मान करण्यात आला तसेच संतसंगतीमुळे ह.भ.प.अशोक सोनार यांना महंत यांच्या हस्ते तुळशीमाळ गळ्यात प्रदान करण्यात आले  तसेच  मेघश्याम महाराज भाजपा प्रदेश अध्यक्ष बबनभाऊ चौधरी,भाजपा जिल्हा सरचिटनीस अरुणभाऊ धोबी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,भाजपा जिल्हा सहचिटणीस संजय आसापुरे,माळी समाज अध्यक्ष डिंगबर पांडु माळी,राजेंद्र चौधरी,यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली नंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदीर देवस्थान महंत माठाधिपती सतिषदास भोंगे महाराज यांनी केले होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने